कॉमर्स मध्ये सीए, सी एस, सी एम ए हे सर्वोत्तम करिअर
करियर मार्गदर्शनासाठी शिरूरमधील वाघ प्रोफेशनल अकॅडमीचे महत्वपूर्ण पाऊल !

शिरुर (जिल्हा-पुणे) : विद्यार्थ्यांना योग्य करियर मार्गदर्शन मिळावे यासाठी त्यांची आवड, क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन विविध क्षेत्रातील संधी, आवश्यक कौशल्ये आणि अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक असते.
नुकतेच- रविवार दि.९ मार्च २०२५ रोजी वाघ प्रोफेशनल अकॅडमी तर्फे कॉमर्स मधील करिअर संधी विषयी बोलताना सी एस पवन छरेजा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट मध्ये काम करणारे सी एस पवन छरेजा यांनी सीए, सी एस, सी एम ए या क्षेत्रात भारतात आणि परदेशात असलेल्या संधी विषयी मार्गदर्शन केले. जेवढे लवकर तयारी करता येईल आणि पास होता येईल तेवढे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे आहे असेही ते म्हणाले.

केंद्र सरकार चे नवीन आर्थिक धोरण, जीएसटी, नवीन कर प्रणाली या मध्ये प्रोफेशनल करिअर मध्ये अनेक संधी उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून असे करिअर निवडावे असे आवाहन त्यांनी केले.

वाघ प्रोफेशनल अकॅडमी च्या वतीने कॉमर्स मधील करिअर संधी यावर विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत या मध्ये लॉ, मॅनेजमेंट, शेअर मार्केट वगैरे मधील नवीन पर्याय यावर दर रविवारी चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे असे वाघ प्रोफेशनल अकॅडमीचे चैतन्य वाघ सर यांनी सांगितले.
कॉमर्स क्षेत्रातील शिक्षण आणि ज्ञान विद्यार्थ्यांना व्यवसाय,अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापनात करियरच्या विविध संधी मिळवून देतात तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासातही महत्वपूर्ण योगदान देतात. ई-कॉमर्सच्या वाढत्या महत्वामुळे कॉमर्स क्षेत्रातील संधी अधिक वाढल्या आहेत.
– चैतन्य वाघ सर (संचालक : वाघ प्रोफेशनल अकॅडमी, शिरुर)



