महाराष्ट्र

एकल (पतीचे/कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या) महिलांसाठी शिरूर नगरपरिषदेत नाव नोंदणी सुरू

महिला व बालकल्याण सभापती आयेशा सय्यद यांचे महिलांना आवाहन..

शिरूर (जिल्हा -पुणे ) : शिरूर शहर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत शिरूर शहरातील नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही कारणामुळे पतीचे किंवा कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या महिलांची शिरूर नगरपरिषद कार्यालय, येथील (नवीन नगरपरिषद इमारत) येथे नाव नोंदणी सुरू आहे.

महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण होण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांमध्ये सहभाग घेता यावा, या उद्देशाने एकल महिलांनी (पतीचे/कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या) आपली नाव नोंदणी करून जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे महिला व बालकल्याण सभापती आयेशा कलिम सय्यद यांनी आवाहन केले आहे.

नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत :

१) आधार कार्ड

२) रेशन कार्ड

३) पॅन कार्ड

४) पतीचे / कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे मृत्यू दाखला

५) बँक पासबुक

अधिक माहितीसाठी मिठ्ठू गावडे (DAY-NULM विभाग) यांच्याशी संपर्क साधावा.

📞 मोबाईल : ९८५०२३१४०१

नाव नोंदणीची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असून, ही सेवा पूर्णपणे विनाशुल्क आहे. सदर नाव नोंदणी शिरूर नगरपरिषद कार्यालय (नवीन नगरपरिषद इमारत) येथे सुरू आहे.

नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्या नेतृत्वाखाली तसेच मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शहरातील एकल (पतीचे/कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या) व गरजू महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, नगराध्यक्षा.

 

 

महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून एकल (पतीचे/कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या) महिलांनी पुढे येऊन नाव नोंदणी करावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.

-आयेशा कलिम सय्यद, सभापती (महिला व बालकल्याण)

Related Articles

Back to top button