पुणे जिल्हामहाराष्ट्र

स्कॉलरशिप परीक्षांमध्ये शिरूरमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

ज्ञानदा कोचिंग क्लासेसने घेतली होती पूर्व महाचाचणी!

शिरुर (जिल्हा -पुणे ):  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित स्कॉलरशिप परीक्षा नुकतीच (दि. 9 फेब्रुवारी रोजी) पार पडली.या परीक्षेमध्ये अनेक मुलांनी आपला सहभाग नोंदवला. शिरुर शहरातही याच परीक्षेची चर्चा सगळीकडे दिसून येत आहे.

 

विद्यार्थ्यांना या परीक्षेचे स्वरूप लक्षात यावे म्हणून शिरूरमधील ज्ञानदा कोचिंग क्लासेस ने सराव चाचणी परीक्षेचे आयोजन (दि. 8 फेब्रुवारी ) केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. विध्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी ज्ञानदा कोचिंग क्लासेस नेहमी तत्पर असते. क्लासेस चे संचालक भुजबळ सर तसेच म्हस्के सर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या परीक्षेचे महत्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवली जाते यावर भाष्य केले. कोण होणार शिरूरचा भास्करचार्य? मंथन यांसारख्या परीक्षांच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होते आणि याचा फायदा त्यांना MPSC / UPSC सारख्या परीक्षांमध्ये होतो.

NMMS या राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेत सलग तिसऱ्यांदा ज्ञानदा कोचिंग क्लासेस चा हर्षराज जांभळकर शिरुर शहरात प्रथम आला असून असेच यश पुढील परीक्षामध्येही मिळवू असा विश्वासही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button