निमोणे गावात प्रचंड उत्साहात पार पडतेय खंडोबाची यात्रा!
माघ पौर्णिमेनिमित्त यात्रा महोत्सव


निमोणे (ता. शिरुर) : माघ पौर्णिमा म्हणजे खंडोबा आणि म्हाळसादेवीचा विवाह सोहळा संपन्न झाला तो दिवस ! या दिवशी अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जातो. अनेक गावांमध्ये खंडोबाची यात्रा भरते.

निमोणे गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही यात्रा महोत्सव साजरा केला जात आहे.माघ पौर्णिमेला पार पडणाऱ्या या यात्रा महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी सकाळी ६:०० वाजता ‘श्रीं’चा अभिषेक झाला . सकाळी ११:०० वा. जागरण गोंधळाचा कार्यक्रम आणि सायंकाळी ५:०० वा. मानाच्या काठ्यांची मिरवणूक पार पडली . सायंकाळी ६:३० वा. ‘श्रीं’च्या मानाचा गाडा ओढला गेला,हा उत्सव पाहण्यासाठी निमोणे पंचक्रोशीतील प्रचंड जनसमुदाय लोटला.
मनोरंजनासाठी यंदा साहेबराव नांदवळकर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरीचा कार्यक्रमही पार पडला आणि सायंकाळी ४:०० वा. कुस्त्यांचा जंगी आखाडा भरणार आहे.

परगावी कामानिमित्त असलेले ग्रामस्थ आवर्जून या उत्सवासाठी गावी येतात आणि आपले राजकीय, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून या दिवशी संपूर्ण गाव एक होऊन या महोत्सवाचा आनंद लुटतात.
संपर्क : शिरूरकट्टा : 7219014288



