
शिरुर (पुणे) : रंगपंचमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे जो होळीनंतर पाच दिवसांनी साजरा केला जातो. ‘रंगपंचमी’ म्हणजे रंग आणि ‘पंचमी’ म्हणजे पाचवा दिवस असा या सणाचा अर्थ आहे. हा सण चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमी तिथीला येतो. रंगपंचमी हा वसंत ऋतूचा, निसर्गातील पाच मूलभूत तत्त्वांचा आणि जीवनातील सकारात्मकतेचा उत्सव मानला जातो.
शिरुर शहरातील “सुवर्णयुगचा राजा मिञ मंडळ, हुडको काॅलनीचे अध्यक्ष शैलेश जाधव यांनी रंगपंचमी सणांच्या निमित्ताने प्रत्येकाने कोरड्या रंगांचा वापर करावा व पाण्याचा बचाव करावा असे आव्हान केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पाण्याचा अपव्यय टाळावा, नैसर्गिक पद्धतीचे रंग वापरावे एकमेकाला नैसर्गिक पद्धतीचे रंग लावून रंगपंचमी साजरी करावी, कारण सध्या उन्हाळा चालु आहे, पाण्याची कमतरता भासू शकते म्हणून आपण पाणीबचत करावी.
“जल है तो कल है” या म्हणी प्रमाणे पाण्याचे महत्तव ओळखुन पाणी बचाव करून रंगपंचमी साजरी करावी. पालकांकडुन आपल्या लहान मुलांना सांगण्यात यावे की पाण्याचा वापर कमी करावा, रंगपंचमी सण साजरा करताना कोरडा रंगाचा वापर करावे कारण कोरडा रंगामुळे पाण्याचा बचत होऊ शकते .

रंगपंचमी साजरी करत असताना पाण्याची नासाडी टाळावी. जमले तर पाण्याचा वापर कमीत कमी प्रमाणात करावा. कारण आपल्याकडे तर पाणी आहे. पण अशी कित्येक ठिकाणे आहेत. जिथे पाण्याचा दुष्काळ आहे. ज्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. अशांचा विचार करून सुकी रंगपंचमी खेळावी. त्याने पाण्याची नासाडी होणार नाही. शांतपणे आणि काळजीपूर्वक अशी रंगपंचमी साजरी करण्याचा प्रयत्न करावा.

रंगपंचमी साजरी करताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा.शक्यतो रंगपंचमी कोरड्या रंगानेच खेळा.
उगीचच जबरदस्तीने कोणालाही रंग लावू नका. एखाद्या व्यक्तीला जर रंग आवडत नसेल तर त्याचा तो मान राखावा आणि त्या व्यक्तीला त्रास देऊन जबरदस्तीने रंग लावू नये.
येणारी रंगपंचमी ही सर्वांना चांगली जावो, आपली संस्कृती टिकली पाहिजे म्हणुन रंगपंचमी हा सण उत्साहात साजरी करा. रंगपंचमी हा सण आपण चांगला कोरडा नैसर्गिक रंग वापरून व पाणी बचाव करून साजरा करावा.सर्व समाज बांधवांनी एकतेचा नारा देत सर्वधर्मीय एकता रंग म्हणजेच रंगपंचमी हा उत्सव एकोप्याने साजरा करावा अशी संकल्पना सुवर्णयुगचा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष शैलेश जाधव यांनी शिरुर कट्टाशी बोलताना मांडली.



