त्रिकोणी गार्डन परिसरात 16 वर्षीय तरुणाची हत्या प्रकरणी विमाननगर पोलिसांची अतिजलद कारवाई- 2 आरोपी ताब्यात.

पुणे शहर : दि.11/04/2026 रोजी खडक पोलीस ठाणे हद्दीत इसम नामे अबूबकर अमजद खान वय 16 वर्ष,रा.A D कॅम्प चौक,आयन मस्जिदच्या मागे,समर्थ,पुणे यास त्रिकोणी गार्डन जवळ,कशेवाडी,पुणे येथे काही अज्ञात इसमांनी धारदार हत्याराने वार केल्याने सदर इसम गंभीर जखमी होऊन मयत झाला आहे व सदर इसमावर वार करणार्यांपैकी दोन इसम हे म्हाडा कॉलोनी,विमानगर येथे राहत असल्याची माहिती प्राप्त होताच, विमाननगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे PSI राठोड ,पोलीस नाईक जोगदंडे, पोलीस अंमलदार लालु कऱ्हे, हरिप्रसाद पुंडे,सागर कासार,प्रशांत सुतार तसेच रात्रपाळी अधिकारी PSI घागरे ,संजयपार्क मार्शल यांनी सदर ठिकाणी जाऊन शोध मोहीम राबवुन दोन इसमांना ताब्यात घेतले.

त्यांची नावे 1)तुफेलअली अश्रफअली सय्यद वय 19 वर्ष रा.प्लॉट नं 101,म्हाडा हाऊसिंग सोसायटी, विमाननगर, पुणे 2)कमरअली सज्जदअली सय्यद वय 19 वर्ष रा.सदर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा कबूल केला असुन त्यांनी गुन्ह्यात वापरलेला हत्यार ताब्यात घेतले आहे व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना खडक पोलीस ठाणे यांच्या ताब्यात रिपोर्टसह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात देण्यात आले आहे.



