क्रीडापुणे जिल्हामहाराष्ट्र

बाभुळसरच्या ‘श्रावणी वाळके’ ला पिपसाईट एअर रायफल प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक

शिरूर: (निलेश काळे) इंदोर (मध्यप्रदेश) येथे २० ते २४ डिसेंबर दरम्यान ‘द एमराल्ड हाइट्स इंटरनॅशनल स्कुल’ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील शालेय नेमबाजी स्पर्धा २०२४-२५ पार पडल्या. यामध्ये कु श्रावणी संतोष वाळके हिने १० मीटर ‘पिपसाईट एअर रायफल’ या प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ४०० पैकी ३९६ गुणांची कमाई करत १७ वर्ष वयोगटाखालील मुली मधील सांघिक सुवर्णपदकाला गवसणी घातली.

देशभरातील सर्व राज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शिरुर तालुक्याच्या बाभुळसर खुर्द गावातील श्रावणी वाळके हि कारेगाव मधील कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये ११ वी विज्ञान शाखेमध्ये शिकत आहे. शिरुर मधील ‘युनिक शुटिंग स्पोर्ट्स क्लब’ मध्ये सराव करत आहे. तिला क्लबचे प्रशिक्षक शरद तरटे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. कारेश्वर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्राचार्य स्नेहलता यादव यांनी श्रावणीच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button