शैक्षणिक क्षेञातील दिपस्तंभ पंढरीनाथ पथवे सर यांची यशोगाथा आणि सेवापुर्ती सोहळा संपन्न…….

राजापूर (ता.संगमनेर) प्रतिनिधी: शैलेश जाधव : नुतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री पंढरीनाथ नवशिबा पथवे सर यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा १३ एप्रिल २०२५ रोजी विठाई मंगल कार्यालय,राजापुर ता.संगमनेर येथे पार पडला.या कार्यक्रामाचे अध्यक्ष म्हणुन महाराष्ट्र राज्याचे मा.महसुल मंञी नामदार बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

या सेवापुर्ती गौरव सोहळाच्या निमित्ताने अकोले विधानसभाचे आमदार किरण लहामटे,नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे,शिक्षक नाशिक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे,महाराष्ट्र राज्य आरोग्य उपसंचालक डाॅ.पी.डी.गांडाळ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक पुरषोत्तम पगारे सर,प्रागतिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल गोडसे सर यांनी देखिल आपली उपस्थिती प्रामुख्याने लावली.

यावेळी अनेक मान्यवरांनी पंढरीनाथ पथवे सर यांच्या शिक्षण विषयक कामावर प्रकाश टाकला.पथवे सर यांनी ३६ वर्ष शैक्षणिक क्षेञात उल्लेखनिय काम केले असुन अनेकदा त्यांना या कामाची पावती म्हणुन विविध पुरस्कारांनी गौरवण्यात देखिल आले होते.अतिशय शांत,संयमी आणि एक प्रेरक शिक्षकाची भुमिका त्यांनी योग्य प्रकारे निभावली.
वयाच्या २१ व्या वर्षी डि.एड पास झाल्यावर २६ जुन १९८९ रोजी मुलाखत देऊन प्रथम क्रमांकाने शिक्षक म्हणुन पथवे सर नोकरीत रुजु झाले. १९९०-९१ ला महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे तर्फे हिंदी परीक्षा केंद्र स्थापन करुन आतापर्यंत ३५ वर्ष बालबोधिनी ते सुबोध पर्यंत परिक्षा आयोजकाचे काम सरांनी केले.परीक्षा संचालक म्हणुन शाळेचे नाव राज्यात अग्रस्थानी नोंदविले. मानव संसाधन विकास मंञालय नवी दिल्ली तर्फे राष्ट्रभाषा प्रचार आणि प्रसारासाठी दिला जाणारा केंद्रीय पुरस्कार सलग तीन वर्ष पथवे सर यांनी पटकावला.आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते पुणे याठीकाणी सन्मानचिन्ह आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानण्यात आले.

महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे तर्फे गुणवंत हिंदी अध्यापक पुरस्कार पथवे सरांनी तीन वेळा मिळाला.जिल्हा हिंदी अध्यापक सेवा संघ तर्फे जिल्हास्तरीय आदर्श हिंदी शिक्षक पुरस्कार पथवे सरांना मिळाला. सरांनी १० वर्ष डि.एड शिक्षक व २६ वर्ष हिंदी विषय शिक्षक म्हणुन काम केले. ५ वी आणि ८ वी स्काॅलरशिपसाठी सलग ३२ वर्ष गणित व बुद्धीमत्ता विषय सरांनी शिकविला. पथवे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्काॅलरशिप परिक्षेत ८ विद्यार्थी ,नवोदय विद्यालयासाठी १० विद्यार्थी तर सैनिक स्कुल सातारा याठिकाणी ४ विद्यार्थींची निवड झाली. पथवे सरांच्या मार्गदर्शनाखाली सन १९९९ पासुन एस.एस.सी बोर्ड परिक्षेत हिंदी विषयात २४ वर्ष १०० % निकाल झाला. डि.एड पदवी घेऊन पर्यवेक्षक, प्राचार्य असणारे संस्थेतील एकमेव शिक्षक म्हणजे पथवे सर….तसेच पर्यवेक्षक पद असतानाही वर्षभर ३३ तासिका घेतल्या. स्व:ताकडे प्राचार्य पद असतानाही इ.१० वीचे वर्गशिक्षक म्हणुन काम पाहीले. प्राचार्य असतानाही टाचणवही लिहणारे आणि सर्व सहकारी शिक्षकांच्या टाचणवही तपासणारे एकमेव शिक्षक म्हणजे पंढरीनाथ पथवे सर…..सन २०२१ पासुन सलग ४ वर्ष एकही रजा न घेता अध्यापन करणारे शिक्षक,३६ वर्षात फक्त २१ दिवस अर्जित रजा घेतली व इतर कोणतीही रजा घेतली नाही.

पंढरीनाथ पथवे सर यांनी आपण समाजाच काही देनं लागतो या भावनेतुन शिक्षण क्षेञ निवडुन ज्ञानदानाचे काम करत सामाजिक सलोखा जपलाच परंतु त्याच बरोबर आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देखील दिले.
मुळचे सोनेवाडी भोजापुर गावचे,एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन हालाखीच्या परिस्थितीवर मात करुन शिक्षण पुर्ण करुन पंढरीनाथ पथवे सरांनी आपल्या कामाची छबी पुर्ण राजापुर गावात उमटवली. सरांनी शैक्षणिक क्षेञात तर उल्लेखनीय कामगिरी केलीच परंतु आपल्या कामातुन वेळात वेळ काढुन समाजपयोगी अनेक कामे पंढरीनाथ पथवे सरांनी केली.या सर्व गोष्टी करत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांच्या सौभाग्यवती सुष्मा पथवे यांनी साथ दिली. अशा अनेक नविन जुन्या गोष्टीचा उजाळा आज या कार्यक्रमाच्या माध्यमातुन झाला.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन काम विजय पथवे यांनी केले,तर जय पथवे यांनी आभार व्यक्त केले.




