महाराष्ट्र

शिरुर शहरात प्रथमच टेलिव्हिजन स्टार राधा खुडे आणि आयकॉन स्टार संगीतकार राहुल साठे यांचा सुमधुर गाण्याचा कार्यक्रम

महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे आयोजन

शिरुर(प्रतिनिधी- शैलेश जाधव ) :  राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समीती २०२५ यांच्या वत्तीने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध युवा गायक व संगीतकार “Icon Star” राहुल साठे आणि टेलिव्हीजन स्टार राधा खुडे यांचा सुमधुर गाण्याचा कार्यक्रम आयोजीत केला असुन शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ठिक ७:०० वा , विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान,एस.टी स्टॅड समोर,शिरुर, या ठिकाणी सुमधुर गाण्याच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आव्हान राष्ट्रपिता जोतीराव फुले व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भालेराव,उपाध्यक्ष निलेश जाधव,ॲड.कुणाल गायकवाड,ॲड.मायाताई गायकवाड, सचिव प्रमोद गायकवाड आणि सर्व समितीतील सदस्यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button