या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये फायर ऑडिट झालेले नाही !

शिरुर (जिल्हा-पुणे, प्रतिनिधी-शैलेश जाधव) : शिरुर शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने माहीती अधिकार अधिनियम २००५ अन्वये, शिरुर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे येमाई अंतर्गत येणार्या सर्व उपकेंद्रांचे सन २०२३-२४ ची फायर ॲाडीटचा लेखी अहवालाची मागणी केली होती.
राज्य सरकार तसेच सर्वोच्च न्यायालयाने सन २००६ तसेच २००९ च्या आदेशानुसार सर्व सरकारी, खाजगी शाळा, काॅलेज, क्लासेस यांच्या इमारतीमध्ये आग प्रतिबंधक यंञणा साधने बसुन घेणे तसेच या सर्व इमारतींचे फायर ॲाडीट करुन घेणे गरजेचे असताना देखिल प्रा.आरोग्य केंद्र कवठे येमाई अंतर्गत येणारे प्रा.आरोग्य उपकेंद्र सविंदणे, प्रा.आरोग्य उपकेंद्र वरुडे आणि प्रा.आरोग्य उपकेंद्र चिंचोली मोराची यांनी आपल्या उपकेंद्राचे फायर ॲाडीट झालेले नाही असा लेखी अहवाल सादर केला आहे.
उपकेंद्रांच्या इमारतीमध्ये आग प्रतिबंधक यंञणा साधने बसविणे आणि फायर ॲाडीट करणे गरजेचे असताना देखिल या उपकेंद्रांनी फायर ॲाडीट केलेले नसल्यामुळे या उपकेंद्रांचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

भर उन्हाळामध्ये आरोग्य उपकेंद्रासारख्या संवेदनशिल इमारतीमध्ये आग लागण्यासारखे अनुचित प्रकार घडल्यास याला कोण जबाबदार ?? असा सवाल सर्वसामान्य जनतेच्या मनात पडला आहे.



