महाराष्ट्र

*सौ. दिपाली चौधरी – ‘सुवर्णयुगचा राजा’ मंडळाच्या भक्ती परंपरेचा आधारस्तंभ*

शिरूरमधील हुडको कॉलनी मधील सुवर्णयुग राजा गणपती ठरतोय सर्वसामान्य भक्तांसाठी संकटमोचक

शिरुर (प्रतिनिधी : शैलेश जाधव) : शिरुर शहरातील हुडको कॉलनीमधील सुवर्णयुगचा राजा मित्र मंडळ हे गणेश मंडळ आपल्या भक्तिभाव, शिस्त आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जाते. या मंडळाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे गणपती बाप्पाची दररोज नित्यपूजा करणारी व्यक्ती – सौ. दिपाली मनोज चौधरी.

दरवर्षी गणेशोत्सवात बाप्पा विराजमान झाल्यानंतर सकाळी लवकर उठून, स्वच्छतेचा संपूर्ण सन्मान राखून, प्रेमपूर्वक बाप्पाची पूजा करण्याचे कार्य सौ.दिपाली चौधरी व त्यांचे पती मनोज चौधरी हे अगदी मनोभावे पार पाडतात. हे केवळ एक धार्मिक कार्य नाही, तर त्यांचं बाप्पावर असलेलं निस्सीम प्रेम, निष्ठा आणि सेवा हेच त्यामागचं प्रेरणास्थान आहे.

त्यांची पूजा नेहमी मंत्रोच्चार, फुलांची सजावट, सुगंधी धूप आणि आरतीने भरलेली असते. रोजचं हे कार्य फक्त पारंपरिकच नाही, तर मंडळातील भाविकांसाठीही एक श्रद्धेचा आणि भक्तीचा अनुभव ठरतो.

सौ. दिपाली चौधरी व पती मनोज चौधरी यांचं हे योगदान हे मंडळाच्या श्रद्धा आणि परंपरेचा अविभाज्य भाग बनलं आहे. आजच्या काळात जेव्हा श्रद्धा केवळ दिखावूपर्यंत मर्यादित राहते, तेव्हा त्यांच्या सारख्या भक्तांचे कार्य खर्‍या अर्थाने प्रेरणादायी ठरतं. यांचा भक्तीची प्रेरणा घेत आजुबाजुची लहान मुले देखिल रोज सायंकाळी गणपतीची आरती करतात.

याच बरोबर वर्षभरातील सण देखिल सार्वजनिक गणपती मंदीराजवळ साजरे करतात,यांच्या या कार्यामुळे काॅलनीमध्ये एकोप्याचे वातावरण तयार झाले असुन सर्व नागरिक एकमेकांच्या सुख,दु:खात धावुन येतात. मागील वर्षी त्यांच्या या कार्याचा गौरव भंडारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमणलाल भंडारी यांनी केला आहे.

सुवर्णयुगचा राजा मित्र मंडळ सौ. दिपाली चौधरी व पती मनोज चौधरी यांच्यासारख्या भक्तांमुळेच अधिक समृद्ध आणि आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण बनले आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवा आणि भक्तिभावाला मंडळ व परिसरातील नागरिकांकडून मनःपूर्वक सलाम!

Related Articles

Back to top button