‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यानंतर शिरुरमध्ये आनंदाचे वातावरण
'भारत माता की जय' च्या घोषणेने वातावरण दुमदुमले!

शिरूर (जिल्हा- पुणे) प्रतिनिधी – (शैलेश जाधव) : नुकत्याच यशस्वीपणे पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेमुळे संपूर्ण शिरुर शहरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरुर शहरातील साई पान महाल येथे शहरातील नागरिकांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” व “भारतीय सैन्य दलाचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. विविध भागांमध्ये पेढे वाटून, फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांनी भारतीय सैन्याच्या विजयाचा जल्लोषात आनंद साजरा केला.
या आनंद जल्लोषात हाजी आसिफ शेख,नगरसेवक मंगेश खांडरे,भुमिपुञ प्रतिष्ठानचे सुशांत कुटे,आर.पी.आय चे शहराध्यक्ष निलेश जाधव,युवा सेनेचे शहराध्यक्ष स्वपनिल रेड्डी, सागर नरवडे, मुश्ताक शेख,मुस्लीम युवा मंच अध्यक्ष वसीम सय्यद, राजुद्दीन सय्यद,अविनाश जाधव, प्रविण तुबाकी, मितेश गादिया,मंगलदास आप्पा बांदल प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश खरबस, मंगेश कवाष्टे , रमेश दसगुडे, राम झेंडे, चेतन साठे, पांडुरंग कुरुंदळे, राहील शेख , राजू शेख, प्रितेश गादीया, सचिन गरूडे, आदीं उपस्थित होते. या सर्वांनी एकमेकांना पेढे भरवून भारत माता की जय अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला.
यावेळी भुमिपुञ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे म्हणाले की, भारतीय सैन्य दलाने आज पाकिस्तान ला चोख प्रत्युत्तर दिले संपुर्ण देश आज आनंद साजरा करत आहे…यापुढेही असेच चोख उत्तर मिळेल हा विश्वास आहे.
भुमीपुत्र प्रतिष्ठाण,खिदमत फाउंडेशन,मुस्लिम युवा मंच या संघटनांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.