महाराष्ट्रसामाजिक

बाबुरावनगर मधील जय मल्हार सार्वजनिक नवरात्र उत्सवाची शिरूर परिसरात चर्चा!

जय मल्हार तरुण मंडळाच्या कार्यक्रमात बाबुरावनगर आणि परिसर सहभागी.

वार्ताहर(अमोल पवार, बाबुरावनगर, शिरूर)- स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे चौक बाबुराव नगर येथे जय मल्हार नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी केलेली आहे, यंदा जय मल्हार तरुण मंडळाच्या सर्व कार्यक्रमांना भाविक भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत.

घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी शिरूर मधील रेणुकामाता मंदिर येथून पवित्र ज्योत आणून ज्योत आणि देवीच्या मूर्तीची बाबुरावनगर मधून मिरवणूक काढून उत्सव मंडपात आणून विधीवत पूजा करून घटस्थापना करून आरती झाली.

दुसऱ्या दिवसापासून सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले .महाराष्ट्राची यशोगाथा शाहीर अक्षय डांगरे यांच्या शाहिरी पोवाड्याने आसमंत दुमदुमून निघाला, तसेच ह.भ.प विशाल महाराज देवढे यांच्या हरिकिर्तनाने ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थीती लावली होती, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध निवेदक उद्धव KP यांच्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.तसेच रोज दांडियाचा ही कार्यक्रम होत असतो.

ढोकसांगवी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि जय मल्हार नवरात्र उत्सवचे आधारस्तंभ मा.श्री.काळूराम (तात्या) मलगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली असून, रोज नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत.

तसेच २७ सप्टेंबर व २८ सप्टेंबर रोजी लहान मुलांच्या लहान गट व मोठा गट अशा डान्स स्पर्धा घेण्यात आल्या.सोमवार दि.२९/०९/२०२५ रोजी मंडळाचे आधारस्तंभ श्री .काळूराम (तात्या) मलगुंडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने जल्लोष अप्सरांचा हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दिनांक 30 सप्टेंबर रोजी मुलांच्या डान्स स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तसेच महिलांचा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. यावेळी स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांचा तसेच पत्रकार बंधुचा आणि मंडळाच्या कार्यक्रमांना सौजन्य लाभलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

१ ऑक्टोबरला होम व महाप्रसाद ठेवण्यात आला आहे, २ ऑक्टोबरला दसरा पूजन आणि ३ ऑक्टोबरला विसर्जन मिरवणुक ठेवण्यात आली आहे. तरी मंडळातर्फे सर्वांना यामध्ये सहभागी होण्याचे विनंती करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे मंडळाचे तरुण सहकारी सचिन बंद्रे, अमोल पवार, नंदकुमार मोरे,नारायण लांडगे,निलेश काळे, सुधीर इनामदार, प्रकाश शेळके, प्रज्वल देठे, गोविंद वाघमारे, भास्कर कदम, माणिक काळे, बिरदेव पुजारी, आयुष झंजाड, सार्थक विसापूरे,प्रकाश कौठाळे सर,सागर काकडे , बाबू भंडारी सर, संतोष गुंड सर, नितीन माने,मायप्पा पुजारी,सागर निकम, सौ.मंगल ताई प्रकाश कौठाळे आदर्श सरपंच देवदैठण, सौ.जिजा ताई सुरेश दुर्गे आदर्श सरपंच निमोणे, सौ.कमल ताई बंद्रे(आजी), सौ.अनिता भंडारी, सौ.आशाताई गुंड, सौ.कविता लांडगे, सौ.शुभ्रा पवार, सौ.सुरेखा मगर, सौ.आरती माने. बाबुराव नगर आणि परिसरातील महिला माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. इ.

सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडत असून बाबुरावनगर तसेच शिरूर परिसरातील लोकांचा सहभाग या कार्यक्रमात पाहवयास मिळाला. जय मल्हार तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे यामध्ये मोलाचे योगदान आहे. पुढच्या वेळी यापेक्षा जास्त मोठा कार्यक्रम करण्याचा मानस आहे. देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे. आपले सर्वांचे प्रेम असेच लाभत राहो 🙏

-मा.श्री.काळुराम (तात्या) मलगुंडे पाटील ( अध्यक्ष, जय मल्हार तरुण मंडळ)

Related Articles

Back to top button