धारिवाल कुटुंबाचा अनोखा श्रद्धाभाव..! गणपतीला पाच किलोचा चांदीचा मुकुट अर्पण!

शिरूर शहर (पुणे) प्रतिनिधी- अविनाश घोगरे: शिरूर येथील मानाचा चौथा समजला जाणारा श्री विठ्ठल मंदिर गणपतीची प्राणप्रतिष्ठा प्रकाशशेठ धारिवाल व आदित्य धारिवाल या पिता–पुत्रांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी या गणपतीला पाच किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला.
आपल्या दानशूर वृत्ती, समाजाविषयी दातृत्व आणि देवाप्रती असलेल्या नितांत श्रद्धेमुळे ओळखल्या जाणाऱ्या धारिवाल परिवारावर गेल्या तीन पिढ्यांपासून शिरूरकर प्रेम करतात, त्याचीच प्रचिती आज शिरूरकरांना आली.
कुंभार आळी येथून गणपतीच्या सुंदर मूर्तीची शास्त्रीय वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत धारिवाल कुटुंबाकडून अर्पण करण्यात येणारा चांदीचा मुकुट घेऊन आलेले आदित्य धारिवाल मिरवणुकीत आघाडीवर होते. त्यांच्या सोबत प्रकाश शेठ धारिवाल व शिरूरचे मा. आमदार अशोक पवार चालत होते. या मिरवणुकीला स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मोठ्या आतषबाजीने धारिवाल कुटुंबाचे स्वागत कुंभार आळीत करण्यात आले.
या वेळी प्रकाश शेठ धारिवाल म्हणाले, “गणपती उत्सव हा शिरूरकरांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आमच्या कुटुंबाची देखील गणपती बाप्पावर मोठी श्रद्धा आहे.”
त्यानंतर गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून मनस्वी आनंद व प्रसन्नता मिळाल्याची भावना आदित्य धारिवाल यांनी बोलून दाखवली.
या वेळी नगरसेवक मुज्जफर कुरेशी, हाफिज बागवान, एजाज बागवान, किरण पठारे, बाळासाहेब जामदार, विजय शिर्के, संतोष शिंदे, दत्तात्रय काळे, संतोष जामदार, संभाजी जामदार, पोपट जामदार, बाबुराव जामदार, राजकुमार जामदार, वसीम शहा, नितीन जामदार, अमित शिर्के, विशाल भावटणकर, श्रीतोष अभंग, मयूर जामदार, शरद जामदार, सनी थोरात, चेतन जामदार, विक्रम जामदार, नितीन शिर्के, रोहन जामदार, नरेंद्र कडूस्कर, पप्पू शिर्के, कुणाल क्षीरसागर, प्रशांत आतकर, चरण जामदार, निलेश कुंभार यांच्यासह कुंभार आळीतील महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत अक्षय शिर्के यांनी, प्रास्ताविक योगेश जामदार यांनी तर आभार शंकर जामदार यांनी केले.
धारिवाल कुटुंबाकडून गणरायाला अर्पण करण्यात आलेला चांदीचा मुकुट हा भक्ती, श्रद्धा, परंपरा आणि समाजाशी असलेल्या नात्याचा उत्तम संगम होता. हा केवळ अर्पण नव्हे, तर श्रद्धेचे, सेवाभावाचे आणि सामाजिक सौहार्दाचे एक अत्यंत प्रेरणादायी रूप ठरले.
गणपती उत्सव हा केवळ सण नसून शिरूरकरांच्या हृदयातील श्रद्धेचा आणि एकतेचा उत्सव आहे. आमच्या कुटुंबाने गेल्या तीन पिढ्यांपासून या भूमीशी आणि देवाशी निष्ठा जपली आहे. गणरायावर असलेली आमची नितांत श्रद्धा आणि समाजाशी असलेलं बंध हेच आम्हाला सतत काहीतरी देण्याची प्रेरणा देतं. गणरायाच्या चरणी चांदीचा मुकुट अर्पण करताना केवळ दान नव्हे, तर आमचं प्रेम, निष्ठा आणि शिरूरवासीयांप्रती असलेला ऋणानुबंध अर्पण करत आहोत.”
–प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ धारिवाल