
शिरूर ( निलेश काळे ) : शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत जनतेच्या मूलभूत समस्या ओळखून त्यावर ठोस भूमिका मांडणाऱ्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रभाग क्र. 4 मधील स्थानिक प्रश्नांवर नुकतीच शिरूर कट्टा या चॅनेलवर प्रकाशित झालेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल चव्हाण यांनी अनेक मुद्द्यांवर थेट व स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले. या मुलाखतीनंतर सर्व स्तरांतून त्यांच्या भूमिकेचे कौतुक होत असून त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे.

खारे मळा ते सुरजनगर परिसरातील नाल्याची असह्य दुर्गंधी, रस्त्यावरील वाढलेले खड्डे, नागरिकांना होणारा त्रास या प्रश्नांवर चव्हाण यांनी ठामपणे आवाज उठवला. स्थानिक समस्यांविषयी उमेदवाराने घेतलेली भूमिका नागरिकांना भावल्याचे चित्र आहे.

कोरोना काळात अमोल चव्हाण यांनी कोविड सेंटरसाठी पुरवलेले नॉनव्हेज तसेच आम्रसाचे जेवण, गरजू विद्यार्थ्यांना केलेल्या 151 सायकलींचे वाटप यांसह विविध समाजकार्यातून त्यांनी दृढ जनसंपर्क निर्माण केला आहे. परिणामी, प्रचाराच्या मैदानात त्यांना मिळणारा लोकसहभाग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

प्रभागातील महत्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करण्याचा निर्धार आणि आतापर्यंत केलेल्या समाजकारणाचा ठसा—या दोन्हीमुळे उमेदवार अमोल चव्हाण हे आगामी निवडणुकीत चर्चेचे केंद्रबिंदू ठरत आहेत.




