महाराष्ट्र

शिरूर शहरात हुडकोमधील शिवजयंतीची चर्चा

बालकांनी स्वयंस्फूर्तीने केली शिवजयंती साजरी

शिरुर (जि. पुणे ): महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात येते . यंदाही शिरूर शहर व पंचक्रोशीत ती उत्साहात साजरी होतेय, पण यंदा सर्वात चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे शिरूर शहरातील हुडको कॉलनीतील चिमुरड्यांनी स्वयंस्फूर्तीने साजरी केलेली शिवजयंती!

 

हुडको कॉलनीतील या चिमुरड्यांनी अभिवादनासाठी निमंत्रित केल्यावर आम्ही पोहोचलो या चिमुरड्यांच्या कार्यक्रमात! विशेष म्हणजे मंडप टाकून यात शिवरायांची प्रतिमा ठेवून या बालकांनी व्यवस्थितरित्या अभिवादनाचा कार्यक्रम पार पाडला.

शिरुर शहरातील शिवजयंती उत्सवात हीरीरीने सहभागी होणारे कृणाल काळे,उमेश शेळके, शैलेश जाधव, आकाश पटवेकर तसेच महिला भगिनींनीही या अभिवादनाला हजेरी लावली.

 

सर्वप्रथम तर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून नंतर स्वरा व्यवहारे या चिमुरडीने छत्रपती शिवाजी महाराजांवर छोटेसे भाषणही केले तद्नंतर लगेचच साई व्यवहारे या मुलाने महाराजांवर पोवाडा गायला. शिवरायांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले गेले, या कार्यक्रमासाठी हुडको कॉलनीतील रुद्र पटवेकर, गणेश मुथा, मुथ्यू कुमार, ऋषिकेश आहिरे, विराज कांबळे ओम लोखंडे आदी बालकांनी पुढाकार घेतला . खरं तर या बालकांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी घेतलेला पुढाकार म्हणजे शिरूरच्या येणाऱ्या उज्ज्वल भविष्याची नांदी म्हणावी लागेल.

शिरुर कट्टा संपर्क : 7219014288

Related Articles

Back to top button