Uncategorized

शिरुरमध्ये तालुकास्तरीय कर्तृत्ववान महिला सरपंच पुरस्कारांचे वितरण 

रामलिंग महिला बहुद्देशीय सामाजिक संस्थेने महिला सन्मानासाठी घेतला पुढाकार

शिरुर (जि.पुणे): ८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन! दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्तृत्वान महिलांचा सन्मान व्हावा या हेतूने तालुकास्तरीय कर्तृत्ववान महिला सरपंच पुरस्कारांचे वितरण रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ८ महिला सरपंचांना देऊन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या वेळी सर्वांचा सन्मान करण्यात आला.अनेक महिला मान्यवरांनी मनोगतेही व्यक्त केली. रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेचे कार्य नेहमीच कौतुकास्पद राहिले आहे, या संस्थेच्या अध्यक्षा राणीताई कर्डिले यांनी जो पुरस्कार देऊन सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे सर्व सरपंच महिलांनी आभार मानले.

गावचा कारभार यशस्वीपणे सांभाळताना अनेक अडचणी येत असतात, त्याला सामोरे जात असताना, घरची जबाबदारीही त्या पार पाडत असतात, त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे म्हणून ८ सरपंच महिलांना ओम शांती सेंटरच्या अर्चना दिदी, शकू दिदी ,अनेक महिला मान्यवर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

अर्चना दिदी, शकू दिदी यांनीही खूप मोलाचे मार्गदर्शन केले, ओम शांती सेंटर मध्ये हा कार्यक्रम घेतल्यामुळे खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली असे मनोगत अध्यक्षा – राणी कर्डिले यांनी व्यक्त केले

यावेळी रामलिंग गावच्या सरपंच – कु.शिल्पाताई गायकवाड, अन्नापुरच्या सरपंच – दिपिकाताई शिंदे, कर्डलवाडीच्या सरपंच – लताताई कर्डिले, सरदवाडीच्या सरपंच – लक्ष्मीताई जाधव, कोंढापुरीच्या सरपंच – अपेक्षाताई गायकवाड, बाभुळसरच्या सरपंच – सोनालीताई फंड, कारेगावच्या सरपंच – वृषालीताई गवारे, मलठनच्या सरपंच – माधुरीताई थोरात या सरपंच महिलांना ओम शांती सेंटरच्या अर्चना दिदी, शकुंतला दिदी, सुप्रिया दिदी, वासंती दिदी, वैशाली दिदी, सुमन दिदी, शोभना पाचंगे, पोलीस महिला कर्मचारी देशमुख मॅडम, माकर मॅडम ,अनेक महिला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी महिला मान्यवरांचे स्वागत नृत्य सादर करून झाले. डॉ.भालेकर सर यांनी मोफत निसर्ग उपचार केंद्र, तपासणी व मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांनी संकल्प केला की महिलांनी महिलांचा आदर केला पाहिजे. तिला अडचणी वेळी साथ दिली पाहिजे. स्वतःसाठी पण जगले पाहिजे. सर्वांनी शिवबाबांचा प्रसादही घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना दिदी यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार अध्यक्षा – राणी कर्डिले यांनी मानले.

Related Articles

Back to top button