स्व. गणेश गौतम घावटे पाटील यांच्या ३७ व्या जयंती निमित्त “ कोण आहे रामलिंग चा प्रज्ञावंत? २०२६” परीक्षा घेण्यात आली.

- रामलिंग (शिरूर) :रामलिंग महिला उन्नती बहु.सामाजिक संस्था व स्व. गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच यांच्या सयुक्त विद्यमाने ‘कोण आहे रामलिंगचा प्रज्ञावंत ? २०२६’ ही सामान्य ज्ञानावर आधारित परीक्षा घेण्यात आली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,रामलिंग या ठिकाणी स्व.गणेश गौतम घावटे पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परीक्षेला सुरवात करण्यात आली.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिही हुशार असतात,त्यांच्या मधील असणारी हुशारी,आत्मविश्वास यांना वाव मिळावा,
स्वतःमधील गुण ओळखता यावेत तसेच विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी, स्पर्धा परीक्षा ची तयारी व्हावी यासाठी या परीक्षेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

मुलांनी अतिशय छान असा प्रतिसाद याला दिला.
यातून ज्यांना जास्त गुण मिळाले त्यांचे नंबर काढून त्यांना ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यामध्ये -प्रथम क्रमांक- प्रणिता कापरे,
द्वितीय क्रमांक- रुद्र माने,
तृतीय क्रमांक-दीक्षा कांबळे यांनी पटकावला.

यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका -सुनीता जगताप , शिक्षक दादाभाऊ वाघमारे, अनिल जगदाळे, जयश्री मांजरे, नीता वाबळे, जाधव मॅडम, लाळगे मॅडम, टोणगे मॅडम इतर सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.

तसेच या वेळी महापुरुषांचे फोटो फ्रेम शाळेला भेट देण्यात आले.
यावेळी मा.उपसरपंच- यशवंत कर्डीले, सामाजिक कार्यकर्ते – गौतम घावटे, विठ्ठल जगदाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष- विजू दौंडकर, सदस्य निलेश लोंढे, रमेश कार्डिले, पुनम औटी असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचा वतीने सर्वांचे आभार रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था अध्यक्ष- राणी कर्डीले यांनी मानले.



