महाराष्ट्र

उद्यापासून बलिदान मास प्रारंभ!

स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी चाळीस दिवस आपल्यासाठी सहन केलेल्या यातनांची जाणीव व्हावी म्हणून पाळला जातो बलिदान मास

शिरुर (जि. पुणे) : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर सर्व महाराष्ट्र प्रेम करतो, आदर करतो. महाराजांनी आपल्यासाठी केलेल्या बलिदानाचे स्मरण संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि म्हणूनच दरवर्षी फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत बलिदान मास पाळला जातो.म्हणजेच यावर्षी 28 फेब्रुवारी ते 29 मार्च 2025 या दरम्यान बलिदान मास पाळला जाणार आहे.

शिरुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांनी मागील वर्षी एक महीना बलिदान मास पाळत, एक महीना चप्पल त्याग केली. याविषयी अधिक माहीती सांगताना ते म्हणाले की, धर्मवीर छत्रपती शंभूराजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बलिदान मास पाळला जातो.

हा मास संपूर्ण महिना पाळला जातो. फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच या वर्षी २८ फेब्रुवारी २०२५ ते २९ मार्च २०२५ पर्यंत हा बलिदान मास आहे. धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी केलेले बलिदान आणि त्या बद्दलची कृतज्ञता म्हणून हा मास पाळला जातो.

महाराजांनी आपल्यासाठी चाळीस दिवस सहन केलेल्या यातनांची जाणीव आपल्याला व्हावी म्हणून या मासाच्या कालावधीत आपण कूठल्याही एका सूखाचा त्याग करायचा असतो. सूतकाचा महिना पाळायचा असतो.संपूर्ण महिनाभर बलिदान मास पाळून शंभूराजांना श्रद्धांजली वाहिली जाते.

धर्मवीर छत्रपती शंभूराजांचे बलिदान आणि त्या बद्दलची कृतज्ञता म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला जातो.

या विषयी अधिक माहीती सांगतांना शैलेश जाधव म्हणाले की, त्यांनी बलिदान मास मागील वर्षी पासुन पाळण्यास सुरुवात केली. आदेश बारगळ आणि मित्र परिवारानेही मागील वर्षी बलिदान मास पाळला. यंदाही शिरूरमधील अनेक लोक बलिदान मास पाळत आहेत. शिरूरकट्टा चे सर्वेसर्वा निलेश काळे ही यंदा प्रथमच बलिदान मास पाळत असून या कालावधीत चहा व सर्व गोड पदार्थांचा त्याग करणार आहेत.

शैलेश जाधव यांनी सर्वांना आव्हान केले आहे की जास्तीत जास्त लोकांनी धर्मवीर छञपती शंभूराजांसाठी बलिदान मास पाळावा.

शिरूरमधील मार्केट यार्ड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर बलिदान मास काळात रोज सायंकाळी 7:30 वा. प्रार्थना होत असते यासाठी बहुसंख्य लोक एकत्र येतात. सर्व शिरूरकरांनी या प्रार्थनेसाठी एकत्र यावे.

Related Articles

Back to top button