पुणे जिल्हामहाराष्ट्रव्यक्तिविशेष

गुनाट गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांना सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी भेट दिली फोर व्हिलर कार

माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन आणि मुख्याध्यापकांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त कार्यक्रम

गुनाट (ता.शिरुर) : विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ असा अनोखा संगम गुनाट गावात नुकताच पहायला मिळाला.

दिनांक 01/02/2025 रोजी गुनाट येथे श्री दत्त माध्यमिक विद्यालयामध्ये 23 वर्ष विना मोबदला सेवा देणारे आदर्श मुख्याध्यापक /शिक्षक श्री. भाऊसाहेब महादू धुमाळ सर यांचा सेवापूर्ती सोहळा आणि या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या सेवापूर्ती सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते या माध्यमिक विद्यालयामध्ये गेल्या 23 वर्षांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले त्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन वर्गणी जमा केली व सेवानिवृत्त होत असलेल्या मुख्याध्यापकांना चार चाकी कार भेट दिली. या सेवापूर्ती सोहळ्या दरम्यान श्री दत्त माध्यमिक विद्यालयामध्ये सध्या शिक्षण घेत असलेल्या इयत्ता ८ वी व १०वी च्या विद्यार्थ्यांनी देखील सरांना भेटवस्तू दिली तसेच गावातील ग्रामस्थ, गुनाट ग्रामपंचायत व श्री दत्त देवस्थान यांच्या वतीने देखील सेवानिवृत्त होत असलेल्या मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला.

सेवापूर्ती सोहळ्याचे कार्यक्रमाकरिता या विद्यालयामध्ये शिकवत असलेले श्री. सतीश कोळपे सर, सौ. संगीता सोनवणे मॅडम, सौ. पुष्पा वाघमोडे मॅडम, सौ. कवठाळे मॅडम तसेच यापूर्वी या विद्यालयामध्ये अध्यापनाचे काम केलेले श्री. तानावडे सर, श्री. शितोळे, सौ. कोरडे मॅडम इत्यादी शिक्षकवृंद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुनाट येथील शिक्षकवृंद, गावातील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक, गावातील ग्रामस्थ, धुमाळ सर यांचे नातेवाईक आणि मोठ्या संख्येने या विद्यालयात यापूर्वी शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते.

 

शिरुर कट्टा संपर्क :7219014288 

Related Articles

Back to top button