पुणे जिल्हा

द्वारकादास श्यामकुमारच्या भव्य शोरूमचे शिरुरमध्ये उद्घाटन

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठेच्या हस्ते उद्घाटन

शिरुर (जि. पुणे, 3 ऑगस्ट 2025 ): 1976 पासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या द्वारकादास श्यामकुमार यांच्या प्रतिष्ठित DS मिल च्या 74 व्या शाखेचे शिरुरमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्राहकांची प्रचंड संख्या उपस्थित होती.

 

पुणे-नगर हायवेवरील शिरूर शहर आता मोठी बाजारपेठ होत असल्याने नवनवीन ब्रँड आता शिरूरकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः पुणे नगर हायवेवरील पाषाण मळा परिसरात 12000 Sq.ft च्या भव्य जागेत सुरु झालेल्या या शोरूममुळे शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा परिसरातील ग्राहकांना उत्तम गुणवत्तेसह परवडणाऱ्या दरामध्ये कपडे खरेदी करणे सोयीचे झाले आहे. शिवाय सुरुवातीपासूनच होलसेल जगतात नाव कमावल्यामुळे आता मिल ते ग्राहक सेवा उपलब्ध करून देत ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण करण्यातही यश मिळाले आहे.

द्वारकादास श्यामकुमारच्या या नवीन शाखेमुळे शिरूरमधील फॅशन-प्रेमींना आता सहजतेने मराठी सांस्कृतिक वस्त्रे आणि ट्रेंडी पर्याय मिळतील. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशीच ग्राहकांची रेलचेल लागल्याने या शाखेच्या भविष्यातील यशासाठी चांगली चिन्हे दिसत आहेत.

पत्ता: द्वाराकादास श्यामकुमार टेक्स्टाईल प्रा.लि. मानकर डोसा शेजारी, पुणे नगर हायवे, पाषाण मळा, शिरूर, जिल्हा-पुणे

Related Articles

Back to top button