मलठणमध्ये ‘माता पालक मेळावा’ जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत मोठ्या उत्साहात साजरा

मलठण: (प्रतिनिधी:राणिताई कर्डिले) नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा व शाळा व्यवस्थापन समिती मलठन यांच्या संयुक्त विद्यमाने माता पालक मेळावा व हळदी कुंकू समारंभ हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरवात सरस्वतीचे पूजन करून करण्यात आली.त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी ‘माता पालक यांना पालक म्हणून जबाबदारी काय असते,मुलांना कसे संस्कार दिले पाहिजेत,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यामध्ये शिकणारे मुलेही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे,म्हणून त्यांना कमी समजू नका.पालक म्हणून त्यांचा सर्वांगीण विकास होण्याकडे लक्ष द्या.शाळेत तुम्ही आले पाहिजेत,यासाठी हा मेळावा घेण्यात आला.‘असे मार्गदर्शन dr.स्मिता बोरा मॅडम यांनी केले.
तसेच शिरूर संवादिनी ग्रुप ने इयत्ता 1ली ते 7वी विद्यार्थ्यांना ओळख स्पर्शाची हा उपक्रम घेतला,यातून मुलांना चांगला स्पर्श,वाईट स्पर्श समजले.
ग्रामीण भागातील महिला स्वतः कधी dr.कडे जाऊन शरीराची तपासणी करत नाही म्हणून या निमित्ताने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.यासाठी उपकेंद्र मलठन सहकार्य मिळाले.
हा कार्यक्रम खूप सुंदर रीतीने साजरा झाला.
सर्व महिलांना वान व अल्पोपहार देण्यात आला.प्रमुख उपस्थिती मध्ये सरपंच,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य,सर्व शिक्षक वृंद, इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
संपर्क: शिरूर कट्टा :72190142788



