Uncategorized

शिरूर नगरपरिषदेला MPCB ची नोटीस

नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कडक इशारा

शिरूर (पुणे) : प्रदूषण ही मानवी जीवनातील एक गंभीर समस्या आहे आणि याच समस्येला शिरूरकर सध्या सामोरे जाताना दिसत आहेत .

नुकतेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शिरूर नगरपरिषदेला नोटीस बजावली आहे. नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनातील वायुप्रदूषण व गंभीर त्रुटिंसंदर्भात ही नोटीस आहे. शहरातील वायुप्रदूषनाच्या वाढत्या तक्रारींमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीत अनेक गंभीर बाबी निदर्शनात आल्याने नगरपरिषदेवर कठोर निर्देश जारी केले आहेत. पंधरा दिवसांमध्ये उपाययोजना न केल्यास कायदेशीर कारवाई होईल असा स्पष्ट इशारा  देण्यात आला आहे.

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, शिरूर प्रवासी संघांचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे शिरूर तालुका संघटक अविनाश घोगरे, मनसेचे शहराध्यक्ष आदित्य मैड व मनसेचे सचिव रवी लेंडे यांनी म्युनिसिपल सॉलिड वेस्ट साईट वरील प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवल्यानंतर याची दखल घेण्यात आली. अवैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याचे व्यवस्थापन केल्याबद्दल संबंधित कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शिरूर कट्टा संपर्क : 7219014288.

Related Articles

Back to top button