पुणे जिल्हामहाराष्ट्र

श्री क्षेत्र रामलिंग (जुने शिरूर) येथे यात्रेची उत्साहात तयारी सुरु

महाशिवरात्रीला होणार मोठा यात्रा महोत्सव

शिरूर (प्रतिनिधी : अमोल पवार) : शिरूर पंचक्रोशीत भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि स्वतः प्रभू श्रीरामांनी शिवलिंग स्थापित केलेल्या श्री क्षेत्र रामलिंग महाराजांची महाशिवरात्री निमित्त असलेल्या यात्रेची सुरुवात लवकरच होत आहे.

आज (दि.२० फेब्रुवारी ) रामलिंग(जुने शिरूर) येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात सुरुवात झाली आहे , येत्या गुरुवारी (दि.२६ फेब्रु.) रोजी महाशिवरात्री असल्याने रामलिंग येथे उत्साहाचे वातावरण आहे त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दरवर्षी केले जाते त्याला भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते.

सप्ताहाची सुरुवात हभप बालाजी महाराज उगले यांच्या किर्तनाने झाली. महाशिवरात्री निमित्त रामलिंग नगरी मध्ये मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

 

महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन तसेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे याचदिवशी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजनही करण्यात आले आहे.

 

दरवर्षी महाशिवरात्रीला होणारी यात्रा तसेच रामलिंग महाराजांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम (दि. 25) शिरूर नगरीत मोठ्या उत्साहात पार पडतो. यंदाही मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र येणार हा अंदाज धरून यात्रेची जय्यत तयारी सुरु आहे.

Related Articles

Back to top button