व्हिजन इंटरनॅशनल स्कूल ने विद्यार्थ्यांना मोफत दाखवला ‘छावा’ चित्रपट!
३५०+ विद्यार्थ्यांकडून गारद पाठ करून घेण्याचा अनोखा उपक्रम
शिरुर (जि. पुणे) : देशभरात छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी दिलेले हे बलिदान, केलेला त्याग या गोष्टी विद्यार्थ्यांनाही समजाव्यात म्हणून शिरूरमधील व्हिजन इंटरनॅशनल स्कूल ने नुकतेच एका उपक्रमाचे आयोजन आपल्या स्कूल मध्ये केले.

यामध्ये गारद पाठ करण्याचा टास्क मुलांना देण्यात आला आणि तब्बल ३५० पेक्षा जास्त मुलांनी गारद पाठ केली. त्यानंतर या विध्यार्थ्यांना नुकताच प्रदर्शित झालेला छावा हा चित्रपट स्कूल प्रशासनाने मोफत मध्ये दाखवला.
स्कूलचे संचालक श्री.विकासजी सुवालाल पोखरणा यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांवर संस्कार घडावेत म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळेच स्कूलसोबतच विकासजी पोखरणा सरांचेही कौतुक सर्वत्र केले जात आहे.

हा चित्रपट पाहताना विद्यार्थी भावुक झाले. ‘हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ‘ अशा घोषणांनी चित्रपटगृह अक्षरशः दणाणून गेले. चित्रपट पाहून झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांनी काही प्रतिक्रिया दिल्या. छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेले बलिदान आणि केलेला त्याग तसेच आपल्यासाठी सहन केलेल्या यातना यावरही विद्यार्थ्यांनी भाष्य केले.

पालकांनी आणि मान्यवरांनीही व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि सर्वच विद्यालयांनी याचा आदर्श घ्यावा असे मत प्रकट केले.
आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम…
महाराssssज..
गडपती, गजअश्वपती, भुपती, प्रजापती..
सुवर्णरत्नश्री पती..
अष्टवधान जागृत, अष्टप्रधान दैष्टीत
न्यायालंकार मंडीत, शस्रास्रशास्र पारंगत
राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर
क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज…
राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो
-छत्रपती शिवाजी महाराज गारद



