
शिरुर (पुणे) : रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी होळी निमित्त माहेर येथील मुलांना पुरण पोळी चे जेवण दिले गेले.
मुलांनी होळीचे पूजन करून त्यात वाईट विचारांचे दहन केले व देवाकडे प्रार्थना केली की ‘सर्वांच भल कर ,कधीही कोणाला उपाशी झोपून देऊ नको.’

होळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचे जेवण असते तर काहींना एक वेळचे जेवण पण मिळत नाही. अनेक ठिकाणी होळी पेटवल्यानंतर त्या मध्ये पुरण पोळीचा नैवद्य टाकतात, असे न करता जिथे गरज आहे तिथे एक जरी पोळी दिली तर त्याचे एक वेळेस चे पोट भरेल. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी सर्वाना विनंती केली की ‘होळीची एक पोळी गरजूच्या मुखी घालावी, सण आनंदाने साजरे करा पण त्यात अंधश्रद्धा ठेऊ नका.’

आज या मुलांना पुरणपोळीचे जेवण दिल्यानंतर त्यांचा चेहऱ्यावरचे भाव शब्दात सांगता येत नाही. सर्व मुलांनी आनंदाने जेवण करून होळी हा सण साजरा करून नेहमी चांगले वागण्याचा संकल्प केला.
यावेळी रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा – राणी कर्डिले यांनी मुलांना नेहमी उच्च विचार करून,एक चांगला माणूस म्हणून जीवन जगण्याचा व होळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राणी शिंदे, डॉ.वैशाली साखरे ,अनेक महिला उपस्थित होत्या.
सर्वांचे आभार माहेरचे विशाल सर यांनी मानले.




