पुणे जिल्हामहाराष्ट्रराजकीय

स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर यांची शिरूर कट्टा चॅनेलवर रोखठोक मुलाखत

विरोधकांच्या टिकेला सडेतोड उत्तर आणि विकासाचा मुद्दा धरून निवडणूक लढवण्याचा संकल्प

रांजणगाव गणपती (ता. शिरूर ): नुकतेच रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार आणि माजी जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी शिरूर कट्टा या चॅनेल ला एक रोखठोक मुलाखत दिली.

 

यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देत आपल्याला राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात उतरण्याची प्रेरणा कशी मिळाली यावर भाष्य केले. ताईंचे पती श्री दत्तात्रय पाचुंदकर पाटील आणि त्यांचे बंधू श्री शेखरदादा पाचुंदकर पाटील यांनी नेहमीच आपल्याला प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आपल्याला राजकीय कारकिर्दीत महत्वाचे यश देण्यात सर्वात मोठा वाटा हा रांजणगाव-कारेगाव गटातील जनसामान्यांचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

रांजणगाव गणपती गावचे माजी सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीत पोहोचलेल्या स्वातीताईंनी सध्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकत, आपल्या तालुक्यात घडणाऱ्या बिबट्याचा हल्ला रोखण्यास  प्राधान्य दिले. शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा यांवर काम केल्यानंतर अजूनही बरेच कामं करण्याचे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश का केला? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी विकासाला गती यावी तसेच अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण या पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले.

रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष पद भूषवताना रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट ला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवण्यात त्यांना जे यश आले त्यापाठीमागे बरेच प्रयत्न करावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.येत्या काळातही जनता आपल्या कार्याचे नक्कीच मूल्यमापन करून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही त्यांनी नमूद केले.

सरतेशेवटी मतदारांना आपण ‘कमळ‘ चिन्हावर निवडणूक लढवत असल्याचे सांगून आपल्याला जिंकून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

मायबाप जनतेसाठी आजवर 100% योगदान दिले आहे. आजही अनेक नवीन प्रश्न, नवीन आव्हाने उभे राहत आहेत. पुनःश्च यावर तोडगा काढण्यासाठी अविरत प्रयत्न करू. सध्या संपूर्ण शिरूर तालुक्यात बिबट्याची दहशत दिसून येत आहे.त्यावरही नक्कीच मार्ग काढू. रांजणगाव – कारेगाव गटासाठी अनेक पायाभूत कामे केली आहेत. या निवडणुकीतही ‘ विकास’ हाच प्रमुख मुद्दा राहील.

स्वातीताई दत्तात्रय पाचुंदकर पाटील ( माजी जिल्हा परिषद सदस्य -रांजणगाव -कारेगाव जिल्हा परिषद गट )

Related Articles

Back to top button