राजकीय

मांडवगण -वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीला भावनिक प्रतिसाद

सुजाता पवार यांचा शांत, संयमी प्रचार जनतेच्या पसंतीस उतरतोय.

मांडवगण–वडगाव रासाई:  मांडवगण–वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुजाता भाभी पवार सध्या घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. पोस्टर वाटप आणि घराघरातील भेटीगाठीद्वारे त्या शांतपणे, संयमित पद्धतीने प्रचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र भावनिक प्रतिक्रिया उमटत असून अनेक ठिकाणी मौन, हळहळ आणि दुःखाची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर सुजाता भाभी पवार यांनी प्रचारातही संवेदनशीलता जपली आहे.

अनेक ठिकाणी त्या नागरिकांच्या भावना समजून घेत, शांतपणे संवाद साधताना दिसत आहेत. राजकीय प्रचारापेक्षा माणुसकीला प्राधान्य देणारी भूमिका त्यांच्या संपर्क मोहिमेतून स्पष्ट होत आहे.

अजित दादांना अखेरची भावपूर्ण श्रध्दांजली त्यांच्या उमेदवारांना मतरुपी दानाने करणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

साधेपणा, थेट संपर्क आणि लोकभावनांचा आदर हीच त्यांच्या प्रचाराची ओळख ठरत असून मांडवगण–वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात त्यांचा प्रचार संवेदना आणि संयम यांचा समतोल साधणारा असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

 

Related Articles

Back to top button