राजकीय

प्रचंड शक्तिप्रदर्शन! आणि उमेदवारी अर्ज

रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या तीनही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

शिरूर | निलेश काळे:
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आज प्रचंड शक्तीप्रदर्शन करत आपली राजकीय ताकद दाखवून दिली. या वेळी गटातील तिन्ही उमेदवारांनी उत्साहपूर्ण वातावरणात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

रांजणगाव जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ.ज्योती मानसिंग पाचुंदकर पाटील व कारेगाव -कान्हूरमेसाई गणाच्या अधिकृत उमेदवार सौ.निर्मला शुभम नवले आणि रांजणगाव गणपती गणाचे अधिकृत उमेदवार श्री महेशबापू निवृत्ती फंड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.

अर्ज दाखल करताना हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक-युवती, महिला कार्यकर्त्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि जोरदार घोषणाबाजीमध्ये हा अर्ज दाखल कार्यक्रम पार पडला. संपूर्ण परिसर राष्ट्रवादीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
या वेळी तालुका व जिल्हास्तरीय नेते, माजी पदाधिकारी, विविध सहकारी संस्था प्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

विकासाभिमुख धोरणे, लोकहिताची कामे आणि स्थिर नेतृत्व याच्या जोरावर निवडणूक लढविण्याचा निर्धार उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला.

मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी प्रचंड जनसमुदाय एकत्र आणून आज राष्ट्रवादीची खरी ताकत काय आहे हे दाखवून दिले. या भागात अजित पवार आणि मानसिंग पाचुंदकर पाटील तसेच आमदार दिलीप वळसे पाटील यांना मानणारा वर्ग मोठा असल्याने जनतेची प्रचंड साथ त्यांना मिळताना दिसत आहे.

रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाने दाखवलेले हे शक्तीप्रदर्शन पाहता, आगामी निवडणूक अधिकच रंगतदार आणि चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

आमचे मित्र मानसिंग भैय्या पाचुंदकर पाटील यांनी नेहमीच कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. ज्योतीवहिनी सुद्धा गोरगरीब जनतेच्या विकासासाठी  लढा देत आहेत. आज  पंचायत  समितीसाठी उभे राहिलेले इतर दोन उमेदवारही तितकेच सक्षमपणे काम करत आहेत. आज वेळ आली आहे या सगळ्यांना बळ देण्याची. त्यांच्यापाठी भक्कमपणे उभे राहण्याची, निश्चितच यावेळी आमचा विजय पक्का आहे.

– काळुराम तात्या मलगुंडे (तंटामुक्ती अध्यक्ष, ढोकसांगवी)

 

Related Articles

Back to top button