शिरूरमध्ये रॉयल एनफिल्ड चे नवीन शोरूम!
आता बाईक सोबतच मिळणार वर्कशॉप सर्विस!


शिरूर :(निलेश काळे ) दुचाकीचालकांची सर्वात आवडती बाईक म्हणजे बुलेट. 1932 मध्ये प्रथमच रॉयल एनफिल्ड ने या बुलेट ची सर्वप्रथम निर्मिती करून संपूर्ण जगाला याची ओळख करुन दिली. तेव्हापासून ते आतापर्यंत रॉयल एनफिल्ड च्या प्रत्येक मॉडेल चा ट्रेंड आजतागायत टिकून आहे.
नुकतेच 26 जानेवारीच्या मुहूर्तावर आपल्या शिरूर शहरातील पुणे-नगर हायवेलगत, पाषाण मळ्यातील, हॉटेल जयेश शेजारीच रॉयल एनफिल्ड च्या नवीन शोरूमचे उदघाटन झाले.
इथे रॉयल एनफिल्ड च्या नवनवीन मॉडेल सोबतच तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये मॉडेल्स पहायला मिळतील. शिवाय Genuine Motorbikes Accessories सोबतच Authorised Workshop ही उपलब्ध करून दिले आहे त्यामुळे आता सर्व्हिसिंग असो वा नवीन बुलेट घेणं! त्यासाठी आता पुणे नगरला जाण्याची गरज नाही.
शोरूम मालक नचिकेत गौड यांनी शिरूरकरांसाठी उपलब्ध करून दिलेले हे नवीन दालन म्हणजे बाईक प्रेमींसाठी पर्वणीच!



