राजकीय

ज्योती मानसिंग पाचुंदकर यांचा विकासाच्या मुद्द्यावर प्रचार

गावागावातील वाड्यावस्त्यांवर जाऊन केला जातोय प्रचार

रांजणगाव/कारेगाव : सदर जिल्हा परिषद मतदारसंघात इच्छुक उमेदवार असलेल्या ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी आपला प्रचार अभियानाला तीव्र गती दिली असून, विशेषतः ‘विकास’ या मुख्य मुद्द्यावर मतदारांशी संवाद साधत ते मतांची मागणी करीत आहेत.

गेल्या काही दिवसांत त्यांनी मतदारसंघातील अनेक गावांमध्ये- वाड्या वस्त्यांवर घरोघरी भेटी देऊन त्या माध्यमातून प्रचाराची राळ उठवली आहे. प्रत्येक कोपरा सभेत ते ‘सर्वांगीण विकास’, ‘मुलांसाठी उत्तम शिक्षण’, ‘स्वच्छ पाणीपुरवठा’, ‘ग्रामीण रस्ते’, ‘महिला सक्षमीकरण’ आणि ‘युवकांसाठी रोजगार’ यासारख्या प्रश्नांवर भर देताना दिसत आहेत.

त्यांना गावोगावी मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादामुळे पक्षीय कार्यकर्ते आशावादी दिसत आहेत. पाचुंदकरांची सरळ आणि मुद्देलक्षी भाषणशैली लोकांना भावताना दिसते आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात हा मतदारसंघ एक महत्त्वाचा मानला जात असल्याने, सर्व पक्षांनी येथे प्रचाराची तीव्रता वाढवली आहे. अशा परिस्थितीत ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी विकासाचा मुद्दा पुढे राहील का, हे पाहण्यासारखे ठरेल.

Related Articles

Back to top button