शिरूरमधील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
शिरूरमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण

शिरुर : (प्रतिनिधी-राणिताई कर्डीले)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिरूरमध्ये विविध उप्रकम राबवून साजरी करण्यात येत आहे.

व्हिजन इंटरनॅशनल स्कूलमध्येही शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिवाजी महाराज यांचा पाळणा गायले गेले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्यावरती छान भाषणे केली. सुंदर नृत्य सादर केले. पोवाडे गायले गेले. लेझिम, ढोल वाजवत मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेने वातावरण आनंदमय झाले होते. अनेक पालकांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली.

व्हिजन इंटरनॅशनल स्कूल मध्ये नेहमीच आदर्शवत उपक्रम होत असतात, आजचा हा शिवजयंती उत्सव खूप जल्लोषात विद्यार्थ्यांनी साजरा केला व सर्वांना शिवजयंतीचा शिवमय शुभेच्छा देण्यात आल्या.

व्हिजन इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन विकासजी पोखरणा यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन , विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. ‘शिवाजी महाराज यांच्या विषयी कितीही बोलले तरी वेळ कमीच पडेल, असे त्यांचे महान कार्य होते, त्यांचे नियोजन हे अचूक असे, राजमाता जिजाऊंप्रमाणे आपल्या मुलांना संस्कार पालकांनी दिले पाहिजे’ – असे मनोगतही त्यांनी व्यक्त केले .

कार्यक्रमाचे सर्व नियोजन विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने करून,कार्यक्रम यशस्वी केला यासाठी सर्वांचे आभार मानण्यात आले.
शिवाजी महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवले पाहिजेत.त्यांचा एक गुण म्हणजे पर स्त्री विषयी नेहमी मातेसमान आदर ठेवला पाहिजे.शाळेत प्रत्येक मुलीला बहीण समजले पाहिजे .सर्वानाच शिवजयंतीनिमित्त शिवमय शुभेच्छा !
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा – राणिताई कर्डीले (पालक)



